क्राईम

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून

  • लिव्ह अँड रिलेशनशिपचा ट्रेंड हल्ली वाढताना दिसून येतोय. मात्र हाच ट्रेंड काहींच्या जीवावर बेतत आहे. एका घटनेनंतर या लिव्ह अँड रिलेशनशिपचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. एका तरुणीचा प्रेम संबंधातून खून करण्यात आला. कोल्हापुरातील संबंधित तरुणी आणि संशयित आरोपी तरुण संपर्कात होते. त्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर हे प्रकरण घडले. गांधीनगर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
  • करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे एका तरुणीचा खून करण्यात आला. समीक्षा नरसिंगे असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती कसबा बावडा येथील रहिवासी आहे. 2018 साली तिचा विवाह झालेला होता. मात्र त्यानंतर पती आणि तिच्यात मतभेद निर्माण झाले होते. तेव्हापासून ती सतीश यादव या मित्राच्या संपर्कात होती. या मित्राने लग्नासाठी तिला विचारले होते. मात्र तिने नकार दिला म्हणून तिची चाकू खुपसून हत्या करण्यात आली.
  • इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामातून दोघांची ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचे वास्तव्य होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यातूनच सतीश यादव याने काल दुपारी समीक्षाचा छातीमध्ये सुरा खुपसून खून केला. या घटनेनंतर तो पसार झाला. समीक्षाला सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. संशयित सतीशच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना झाली आहेत.

Related Articles

Back to top button