राजकीय

ब्रेकिंग! अजितदादा गटात राजकीय भूकंप

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. परिणामी अजितदादा गटाचे टेन्शन वाढणार आहे. लोणावळ्यात त्यांच्या गटातील महत्त्वाच्या नेत्यांसह जवळपास 137 जणांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, यामुळेच अजितदादा गटाची जागा वाटपावर 5 आणि 6 तारखेला मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. यावेळी अजितदादा गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना त्यांच्या गटात अशाप्रकारची घटना घडल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे.
माहितीनुसार, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. मात्र आमदार शेळके यांनी परस्पर निर्णय घेत लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी दिली. यामुळेच पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला आहे.

Related Articles

Back to top button