बिजनेस

ब्रेकिंग! आधार अपडेट, यूपीआय, गॅस सिलेंडर, पीएफ

  • मे महिन्याचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून म्हणजेच रविवारपासून जून महिना सुरू होत आहे. प्रत्येक महिन्यात असे काही बदल होतात, जे तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात.
  • आता या जून महिन्यातही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यात ईपीएफओ, सीएनजी, जीएसटी तसेच कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमधील बदलांचा समावेश आहे.
  • उद्यापासून केंद्र सरकार ईपीएफओचे नवीन व्हर्जन – EPFO 3.0 – लाँच करू शकते. EPFO 3.0 हे नवे व्हर्जन लाँच झाल्यावर 9 कोटींहून अधिक ग्राहक कोणत्याही अडथळ्याशिवाय एटीएममधून देखील ईपीएफचे पैसे काढू शकतील.
  • प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी तसेच सीएनजीच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला घरगुती किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच सीएनजीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतो. अनेकदा किमती स्थिर राहतात. त्यामुळे उद्या या ग्राहकांना दिलासा मिळतो की, खिशाला कात्री लागणार आहे, हे स्पष्ट होईल.
  • जून महिन्याच्या 16 तारखेपासून UPI ​​पेमेंट आणखी जलद होतील. तथापि, बँका आणि पेमेंट ॲप्स नव्या नियमांची सज्जता करणार असल्याने एक जूनपासून या प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ट्रॅन्झॅक्शन रिस्पॉन्स कालावधी 30 सेकंदांवरून 15 सेकंदांपर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • जूनमध्ये मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा संपणार आहे. त्याची अंतिम मुदत १४ जून आहे. तोपर्यंत तुम्ही आधार अपडेट केले नाही तर तुम्हाला या कामासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल.

Related Articles

Back to top button