क्राईम

मित्रानेच मित्राचा केला खून

  • सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मित्रानेच मित्राचा केला खून केल्याची घटना समोर येत आहे. मोहोळ तालुक्यात आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेताजी तानाजी नामदे (रा. सौंदणे) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
  • याप्रकरणी विकास मारुती गुरव या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मित्राचा मृतदेह पुरल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोर्टासमोर त्याला हजर केले असता त्याला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी २४ मे रोजी गेला होता. मात्र तो बराच वेळ घरी न आल्याने वडील तानाजी नामदे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहोळ पोलिस ठाण्यात दिली होती. त्याची गावात शोधाशोध होत असताना सौंदणेतील एकाने नेताजीला मोटारसायकलवर आरोपीच्या घरासमोर पाहिल्याचे त्याने सांगितले. तेव्हा आरोपीनेच नेताजीचे बरेवाईट केल्याच्या संशय होता. फिर्यादी तानाजी यांच्या शंकेनुसार पोलिसांनी विकास याला ताब्यात घेतले. मित्राने आईबरोबरच अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. मृतदेहाबाबत चौकशी केली असता शेतामध्ये पुरल्याचे सांगितले. 

Related Articles

Back to top button