ब्रेकिंग! पुढील 48 तास धोक्याचे

Admin
1 Min Read
  • सोलापूरसह अन्य भागात चांगलाच पाऊस कोसळत आहे. दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जबरदस्त हजेरी लावली असून हवामान विभागाने महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
  • कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आजपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस अद्यापही कायम आहे.
  • उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. 
  • मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
  • छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Share This Article