राजकीय

शिंदे सरकार शंभर टक्के पडणार; राऊतांचा मोठा दावा

शिंदे सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडी सककारमधील अनेक नेत्यांकडून दिले जात आहेत.यात भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचे म्हटले. यामुळे राज्यातील शिंदे सरकार कोसळणार की काय, यावर उलट-सुलट चर्चा आहे.

यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे सरकार शंभर टक्के कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

राऊत म्हणाले की, दानवे कधी कधी खरंही बोलून जातात, हे मध्यावधीचे संकेत समजावे. शिंदे सरकार 100 टक्के पडणार असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

Related Articles

Back to top button