महाराष्ट्र
छगन भुजबळांना अचानक मंत्रिपदाची लॉटरी

- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- जरांगे म्हणाले, भुजबळांनी शपथ घेतली की नाही, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांना मंत्रीपद मिळाल्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. मात्र, अजित पवार जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
- जो व्यक्ती मराठा आरक्षणाला विरोध करतो, त्यालाच मंत्रिपद दिले जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने भुजबळांना तात्पुरता गोडवा दिला गेला असावा – चॉकलेटसारखा! पण त्यांच्या आनंदावर लवकरच विरजण पडेल, असेही जरांगे म्हणाले.



