महाराष्ट्र

ब्रेकिंग! ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले

  1. सरकारने राज्यात लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण सात हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निर्दशनास आले. त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
  2. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे.
  3. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००, वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० : एकूण अपात्र महिला – पाच लाख.
  4. सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असे ट्विट तटकरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button