क्राईम

फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव

  • राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे कॉलेज परिसरात असलेल्या कालिका फर्निचरच्या दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानाच्या मागे राहणाऱ्या आणि झोपेमध्ये असलेल्या रासणे कुंटुंबाला घेरले. ही आग इतकी भीषण होती की, त्यातून या कुटुंबाला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरातील दोन लहान मुलांसह तीन प्रौढांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
  • या मृतांमध्ये मयूर अरूण रासणे, पत्नी पायल मयूर रासणे, दोन मुले अंश मयूर रासणे, चैतन्य मयूर रासणे आणि आजी सिंधू चंद्रकात रासणे यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर यामध्ये मयूर यांचे वडील अरूण रासणे हे मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेलेले असल्याने ते या दुर्घटनेतून वाचले आहेत.
  • दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहीतीतून समोर आले आहे. मात्र, अद्याप या घटनेचे ठोस कारण सांगता येत नाही. या आगीने रौद्ररूप धारण कलेले असल्याने ही आग विझवण्यास बराच वेळ लागला. 

Related Articles

Back to top button