महाराष्ट्र
स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच उद्योग

- एका स्पा सेंटरवरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आला. पुण्याच्या बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती उघडकीस झाली. आरोपी स्थानिक भाषेतील वृत्तपत्र चालवत ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून बाप-लेकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असे अटक केलेल्या बाप-लेकाचे नाव आहे. याशिवाय एका महिला व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये असलेले ग्राहक आणि महिला उच्चभ्रू असल्याची माहिती समोर येत आहे. बाणेर पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर बनावट ग्राहक पाठवले असता, तिथं स्पा सेंटरच्या नावाखाली प्रत्यक्षात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसानी संबंधित स्पा चालक, व्यवस्थापक आणि जागा मालकावर महाराष्ट्र वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.



