क्राईम

ट्विस्ट! गौरी त्रास द्यायची, सर्कीटसारखी वागायची, भांडणात अंगावर यायची

  • राज्यातील गौरी खेडकर नावाच्या महिलेची पती राकेश खेडेकर याने हत्या केली आहे. ही घटना कर्नाटकतील बंगळुरू येथे घडली आहे. रागाच्या भरात राकेश याने गौरीच्या पोटात तीनवेळा चाकू खुपसला. गळा चिरून तिची हत्या केली. नंतर शरीराचे तुकडे केले. हे तुकडे बॅगमध्ये भरून हत्येची माहिती राकेशने स्वत:च्या कुटुंबीयांना दिली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली आहे.
  • खरेतर गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी होती. दोघांच्या लग्नाला राकेशच्या कुटुंबाचा विरोध होता. पण, एकमेकांशी लग्न करू अन्यथा लग्न करणार नाही, यावर दोघे ठाम होते, असे राकेशच्या वडिलांनी सांगितले आहे. पण, दोघांमध्ये नेमके काय घडलेले? ज्यातून ही हत्या झाली? याची सगळी माहिती राकेशच्या वडिलांनी दिली आहे.
  • हे सगळे इथेपर्यंत पोहोचेल, असे वाटले नव्हते. दोघांमध्ये रोजच भांडण होत होती. गौरी कधीकधी वेड्यासारखी करायची. ती भांडणात अंगावर यायची. तिने एकदा तिच्या भावाला देखील अंगावर जाऊन मारले होते. तिचा स्वभाव माहिती असल्याने आम्ही आधीपासून लग्नाला विरोध करत होतो. परंतु, ते एकमेकांना सोडायला तयारच नव्हते. चार वर्षे आम्ही दोघांच्या लग्नाला विरोध करत होता. पण, ते त्यांच्या निर्णयावरती ठाम होते. आम्ही एकमेकांसोबत लग्न करू, नाहीतर लग्नच करणार नाही, असे दोघे म्हणायचे, असे राकेशच्या वडिलांनी सांगितले.

Related Articles

Back to top button