क्राईम

ब्रेकिंग! लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले

  • गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा आज अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघातस्थळावरून धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते.
  • अहमदाबाद पोलिस कंट्रोल रूमने देखील याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. टेकऑफनंतर 15 मिनिटांत लगेच विमान दुर्घटना झाली. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली आहे. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची आकडा अजून समोर आलेला नाही. परंतु अनेक प्रवासी अपघातग्रस्त आहेत.
  • फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळले. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे देखील सांगितले जात आहे . विमान अपघातामुळे परिसरातील इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Back to top button