‘या’ राज्यात लागू झाला समान नागरी कायदा

समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसीमध्ये लग्न, घटस्फोट, उत्तराधिकार आणि लिव्ह-इन साठी कायदे आहेत. अन्य देशातील राज्यांपासून हे कायदे वेगळे आहेत. दरम्यान, देवभूमी उत्तराखंडमध्ये आजपासून मोठा बदल झाला आहे. आजपासून राज्यात समान नागरी कायदा लागू झाला आहे. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य आहे.
काय बदल होणार?- लग्नाचे रजिस्ट्रेशन अनिवार्य असेल. त्यासाठी ग्रामसभेच्या स्तरावर देखील ही सुविधा देण्यात येणार आहे. लग्नाचे रजिस्ट्रेशन सहा महिन्यांच्या आत करावे लागेल. उत्तराखंडमध्ये आता लिव्ह इन रिलेशनशीपमधील जोडप्यांनाही रजिस्ट्रेशन करावे लागेल. लिव्ह इन रिलेशनशिपमधून एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याला लग्नानंतर होणाऱ्या मुलांसारखेच सर्व कायदेशीर अधिकार असतील.
विवाहयोग्य मुलींचे वय एक समान असेल. सर्वांना मुले दत्तक घेण्याचा अधिकार असेल. अन्य धर्मातील मुलांना दत्तक घेता येणार नाही. मुलींना मुलांच्या बरोबरीने वारसा हक्क मिळेल.अनुसूचित जनजातींचा या कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पूजा आणि परंपरेच्या प्रथांमध्ये कोणताही बदल नाही. बहुपत्नीत्व आणि हलाला प्रथेवर बंदी. घटस्फोटासाठी सर्व जाती आणि धर्मासाठी एकच नियम.



