राजकीय

ब्रेकिंग! शरद पवारांना साक्षी ठेवून ठाकरेंनी केली मोठी घोषणा

गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार अशी ही चर्चा आहे. परंतु, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. 

आपण करा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर. माझा त्याला पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला मुख्यमंत्रीपदाबाबत स्वप्न पडत नाहीत. तशी इच्छा बाळगूनही मी काम करत नाही. त्यामुळे आपण जो कोणी चेहरा जाहीर कराल, त्याला माझा पाठिंबा असणार आहे, असे ठाकरे म्हणाले. ते महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

आम्ही शिवसेना म्हणून भाजपासोबत होतो. त्यामध्ये जो आम्हाला अनुभव आला, तो महाविकास आघीडमध्ये यायला नको. कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे धोरण ठरले. त्यामुळे युतीमध्येच याची ही जागा पाडा ती जागा पाडा यामध्ये आम्ही स्वत:च्याच पायावर धोंडा टाकून घेतला आहे. त्यामुळे हे धोरण महाविकास आघाडीत नको. अगोदर ठरवा आणि चला पुढे. मला काही प्रॉब्लेम नाही, असे म्हणत थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा, अशी मागणीच यावेळी ठाकरे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa