महाराष्ट्र
उद्धव ठाकरेंनी काल सर्वात मोठा गुन्हा केला

- वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून देशात राजकीय वातवरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी वक्फ बोर्ड सुधारणा बिलाच्या विरोधात मतदान केले. ठाकरेंच्या खासदारांनी मतदान केल्यानंतर आज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
- ठाकरेंच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकेचे बाण सोडले.
- शिंदे म्हणाले, मी सांगतो की, वक्फ बोर्डाच्या विरोधात निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंनी खरा चेहरा दाखवला आहे. त्यांची दुटप्पी भूमिका दिसली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे. यावर त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. ठाकरेंनी २०१९ साली स्वार्थासाठी हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून सरकार स्थापन केले. त्याच्याहून मोठा गुन्हा काल केला. त्यांची आज मान शरमेने झुकली आहे.