राजकीय

ब्रेकिंग! अक्कलकोटमध्ये नवा धमाका, मल्लिकार्जुन पाटील यांची एन्ट्री

अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तसेच येत्या 22 तारखेला अक्कलकोट येथे होणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमास अनुसरून आज जेऊर येथून गाव भेट दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला. 

मल्लिकार्जुन पाटील यांनी आपल्या गावातूनच दौऱ्यास प्रारंभ करताना आपल्या स्वाग्रामात ऊत्स्फूर्त स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गावात आगमन झाल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. श्री काशीविश्वेश्वर मंदिर समोर झालेल्या या छोट्या खानी कार्यक्रमात मल्लिकार्जुन पाटील यांनी गावकऱ्यांना येत्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आपण सुद्धा बद्ध राहून सहकार्य करावे आणि काँग्रेस पक्षाचे चळवळ तळागाळात रुजविण्यासाठी हातात हात घालून काम करण्यासाठी सहकार्य करावेत असे आवाहन केले.

याला गावकऱ्यांनी मनापासून दाद देत त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे नेते अशपाक बळोरगी, सुवर्णाताई मलगोंडा, माजी सरपंच शिवाजीराव कलमदाणे, महांतेश पाटील, उपसरपंच काशिनाथ पाटील, शिवपुत्र चौलगी, सुरेश सोनार, सूर्यकांत चौधरी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button