महाराष्ट्र

अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारची करडी नजर

  • लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून तब्बल दोन कोटी 63 लाख खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. माहितीनुसार, पुढील काही दिवसात या अर्जाची तपासणी होणार आहे.
  • लाडकी बहीण योजनेत दोन कोटी 63 लाख महिलांची माहिती दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागवण्यात आली होती मात्र आतापर्यंत आयकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र आता आयकर विभाग माहिती देणार असल्याने पुढील काही दिवसात या अर्जांची तपासणी पूर्ण होणार आहे.
  • आयकर विभागाकडे महिला व बालविकास विभागाने दोन कोटी 63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती. या योजेनचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे अशी अट सरकारने ठेवली आहे. त्यामुळे आता दोन कोटी 63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button