महाराष्ट्र

ब्रेकिंग! सुपारी घेतली नाही, माफी मागणार नाही

  • कुणाल कामराच्या गाण्याने नवा वाद पेटला आहे. कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकात्मक गाणे तयार केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. शिंदेंच्या शिवसैनिकांनी काल कामराचा खारमधील स्टुडिओ फोडला होता. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दिली. कामराने सुपारी घेऊन शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप महायुती आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप केला आहे. या आरोपानंतर मी सुपारी घेतली नाही. मी माफी मागणार नाही, असे म्हणत कामराने वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले.
  • कामराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. कामराने सुपारी घेऊन वक्तव्य केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानंतर कामराने प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई पोलिसांनी कामराची फोनवरच प्राथमिक चौकशी केली. वक्तव्य मागे घेणार नसल्याचे कामराने पोलिसांना सांगितले आहे. कोर्टाने सांगितल्यावर माफी मागेन, असेही त्याने म्हटले आहे.
  • मी सुपारी घेतली नाही. बँक खाती तपासा, असे कामराने पोलिसांना सांगितले. कामराच्या वक्तव्यानंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. 

Related Articles

Back to top button