क्राईम

ब्रेकिंग! राज्यातील गावगाडा होणार ठप्प

  • बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहे. त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे. आता अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील या प्रकरणी पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार असून देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
  • देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले असून विधानसभेत देखील यावरून गदारोळ झाला. या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करण्यात येणार व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरपंच परिषदेतर्फे ९ जानेवारी बंद पुकारण्यात आला आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवल्या जाणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. 

Related Articles

Back to top button