महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही?

  • लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यात या योजनेच्या पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत. 
  • ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने महिला संभ्रमात आहेत.
  • या योजनेचा डिसेंबर 2024 महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी 2025 मधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे 25 ते 28 तारखेच्या दरम्यान जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही.
  • फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेच्या निकषांत न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेचे काही निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषांनुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. अपात्र महिलांची संख्या 9 लाखांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  • त्यामुळे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम येत्या आठ दिवसांत पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.

Related Articles

Back to top button