क्राईम

पीडित आईच्या व्हायरल पत्रानंतर…

  • बीडमधील केएसके महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या साक्षी कांबळे या तरुणीने छेडछाड व ब्लॅकमेलिंगला कंटाळून धाराशिव येथील मामाच्या घरी 24 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून साक्षीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज बीडमध्ये जाऊन साक्षीच्या घरी सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर गोऱ्हे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
  • याप्रकरणी साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाऊ म्हणून पत्र लिहून न्याय मागितला होता. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सोमवारी साक्षीच्या आई कोयना यांच्याशी फोनवर संवाद साधत तिला धीर दिला आणि न्यायाचे आश्वासन दिले. मी बीड व धाराशिव जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांशी बोललो असून विभागीय आयजींशीही चर्चा केली आहे. दोषींना माफ केले जाणार नाही, त्यांच्या विरोधात योग्य ती आणि कठोर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
  • साक्षी ही बीड येथील केएसके महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. संशयित अभिषेक कदम याच्यावर छेडछाड व ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. पोलिसांनी कदमला अटक केली असली तरी नंतर त्याला जामीन मिळाला होता. 

Related Articles

Back to top button