महाराष्ट्र
संयम संपला! 22 दिवस झाले ओsss, आता मीच एकाएकाला मारून येते

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. देशमुख यांची हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबद्दल मी सांगणार असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. ते भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
- यावेळी संतोष देशमुख यांची पत्नी म्हणाली, काय वेदना होत आहेत, ते आमच्या जीवाला माहिती आहे. का इतका वेळ लागतोय? आता आमचा संयम संपत चालला आहे. आता अक्षरश: मला तर वाटतय की, मी जाऊन एका एका मारून येऊ.आता मला वेदना असह्य होत आहेत.
- दरम्यान संतोष देशमुख यांची आई म्हणाली, माझ्या लेकराचा त्या दिवशी उपवास होता. मी स्वत:च्या हाताने लेकरासाठी स्वयंपाक केला होता. जेवायला येण्यासाठी मी स्वयंपाक केला होता. माझ्या लेकरासारखा देवमाणूस कुठेच भेटणार नाही.