ब्रेकिंग! शिंदे सत्कारावरून संजय राऊतांची शरद पवारांवर जळजळीत टीका

दिल्लीत काल झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी भाषणात पवार यांनी शिंदे यांचे कौतुक केले. या कौतुकानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पवारांवर जळजळीत टीका केली. तर, आता राष्ट्रवादीनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन आहे, असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला.
शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखे आहे. पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची असल्याचा पलटवार कोल्हे यांनी राऊतांवर केला. शरद पवारांना किती राजकारण कळते हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असे वाटते की, राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, असेही कोल्हे यांनी म्हटले.