देश - विदेश
सकाळी सात वाजेपर्यंत किती कोटी लोकांनी पवित्र स्नान केले?
- प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज चेंगराचेंगरीची घटना घडली. आज मौनी अमावस्या शाही स्नानाचा दिवस असल्याने प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थितीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले असून कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात आता स्नान पुन्हा सुरु झाले आहे. स्थिती आता नियंत्रणात आहे. संगमावर स्नान सुरु आहे. भाविक मोठ्या आस्थेने डुबकी मारण्यासाठी येत आहेत. लोकांनी संगमावर गर्दी करु नये, त्याऐवजी जिथे आहेत तिथे स्नान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे . मौनी अमावस्येला घाटांवर पवित्र डुबकी मारण्यासाठी भाविक येत आहेत.
- उत्तर प्रदेश सरकारनुसार आज सकाळी 6 वाजेपर्यंत 1.76 कोटी लोकांनी घाटांवर स्नान केले आहे. 28 जानेवारीपर्यंत एकूण 19.94 कोटी लोकांनी स्नान केल्याची माहिती आहे. शाही स्नानाचा दिवस असल्याने प्रयागराजमध्ये आज विविध भागातून 360 पेक्षा जास्त ट्रेन्स चालवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. सध्या तरी कुठलीही स्पेशल ट्रेन रद्द करण्याचा प्लान नाही, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.