राजकीय
ऑपरेशन टायगर मोडून काढणार

- शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाला भगदाड पाडण्यासाठी शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. या ऑपरेशन टायगरमध्ये शिंदे गटाकडून आमदार, खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाने एकामागोमाग एक नेते गळाला लावले. शिंदे गटाकडून होणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटही सरसावला आहे. ठाकरे गट आता ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आला आहे.
- ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार आहे. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेने आपली रणनीति आखली आहे. पक्षातील महत्त्वाचे नेते आता राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत.
- ऑपरेशन टायगरला निष्प्रभ करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहेत. स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू नेते जाणून घेणार आहेत. संघटनेत विश्वास संपादन करून एकमेकांमध्ये समन्वय राखत संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न ठाकरेंचे नेते आपल्या दौऱ्यात करणार आहेत.