महाराष्ट्र
ब्रेकिंग! भर पत्रकार परिषदेत अजितदादांचा धमाका

- राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ॲक्शन मोडमध्ये दिसत असून दररोज धडाकेबाज निर्णय घेत आहे.
- राज्यातील नागरिकांसाठी आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचे आहे, अशी भूमिका त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. विशेष म्हणजे अजितदादांच्या या विधानाचा प्रत्ययदेखील पुढील काही मिनिटातच अनुभवण्यास मिळाला.
- दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक शिक्षकांचे पगार होत नसल्याची टीका विरोधक सरकारवर करत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देखील यावर प्रश्न अजितदादा पवारांना विचारण्यात आला.
- यावर प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी थेट मंत्रालयातील अर्थ विभागाच्या सचिवांना फोन लावण्याचे आदेश दिले आणि संबंधित सचिवांना पगार का झाला नाही, असा प्रश्न विचारला. त्यानंतर आमच्या विभागाकडून पगाराचे पैसे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र काही विभागाच्या काही टेक्निकल प्रॉब्लममुळे शिक्षकांचे पगार उशीरा होत असल्याचे अजितदादांनी पत्रकारांना सांगितले.



