खेळ
ब्रेकिंग! टीम इंडियाची भिंत कोसळली

- टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. पुजाराची कारकिर्द जवळपास वीस वर्षांची होती. या वीस वर्षांत चेतेश्वरने तेरा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यतीत केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2005 मध्ये पुजाराने पहिला सामना खेळला होता. हा सामना सौराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात होता. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अखेरचा सामना फेब्रुवारी 2025 गुजरात विरुद्ध खेळला होता.
- 2010 मध्ये पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बंगळुरूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना कसोटीतील होता. यानंतर 2013 मध्ये बुलावायो येथे झिम्बाम्बे विरुद्धच्या सामन्यातून पुजाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुजाराला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही. परंतु, त्याचे नशीब कसोटीतच चमकले.
- मागील 13 वर्षांपासून चेतेश्वर कसोटीत भारतीय संघाचा हुकूमी एक्का होता. सलामीलाच येऊन तो अगदी चिवट फलंदाी करायचा. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात चेतेश्वरचे नेहमीच योगदान असायचे. चेतेश्वरने त्याचा अखेरचा कसोटी सामना देखील जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच खेळला होता. हा चेतेश्वरच्या क्रिकेट कारकिर्दीतील खास योगायोगच म्हणावा लागेल.
- चेतेश्वरने एकूण 103 कसोटी आणि फक्त 5 वनडे सामने खेळले. या एकूण 108 सामन्यांत त्याने 7 हजार 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 19 शतके चेतेश्वरच्या नावावर आहेत. 206 नाबाद हा त्याचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आहे.



