महाराष्ट्र

ब्रेकिंग! देवाभाऊ अभिनंदन, तुम्ही कौतुकास पात्र

एक तर मी राहीन, नाहीतर तू राहशील, अशी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंची काही प्रमाणात भाषा बदलल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या आणि महायुतीच्या नेत्यांवर आग ओकणाऱ्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क कौतुक करण्यात आले आहे. हा प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे ‘सामना’च्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले आहे. 

नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे. तसेच देवाभाऊ, अभिनंदन! हा अग्रलेखाचा मथळाही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये बीडमधील गुन्हेगारीचा पुसटसा उल्लेख असला तरी उर्वरित अग्रलेखात फडणवीस यांचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे हा अग्रलेख उद्धव आणि फडणवीस यांच्यातील नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Related Articles

Back to top button