महाराष्ट्र

ठॉय, ठॉय थांबले पाहिजे

  • बीडमधील पिस्तूल परवान्याच्या मुद्यावरूर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. पिस्तूल परवाना आणि त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याप्रकरणी पोलीस अधीक्षकही दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी धस यांनी केली.
  • जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर धस यांनी माध्यमांशी बोलताना बीडमध्ये होत असलेल्या पिस्तूलाच्या गैरवापरावर संताप व्यक्त केला. 
  • धस यांनी सांगितले की, भाजीपाल्यासारखे, खेळण्यातील बंदुकीसारखे पिस्तुल वापराचे परवाने देण्यात आले आहेत. या परवान्याचा आढावा घेऊन ते रद्द करायला पाहिजेत. त्याशिवाय, कोणत्या पोलीस अधीक्षकांच्या काळात सर्वाधिक परवाने दिले, त्याचे नाव आणि यादी मागवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • ज्यांनी बेकायदेशीरपणे पिस्तुल परवाने दिले असतील, शिफारस केली असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. चिरीमिरी घेऊन एसपी आणि डीवाएसपी अग्निशस्त्र परवाने दिले असेल तर बिहारच्या पुढचे काबुलिस्तान झाल्याची वेळ आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, ढाब्यावर ठॉय ठॉय केले जात आहे. हे सर्व थांबले पाहिजे. सर्व परवाने रद्द करावे अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा धस यांनी दिला.

Related Articles

Back to top button