खुशखबर ! लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात

अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला. महायुतीच्या या विजयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला. सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, या योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार यावर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आजपासून हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे.
या योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत दीड हजार रुपयांप्रमाणे साडे सात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती.
आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर दीड हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.