महाराष्ट्र

ब्रेकिंग! रणजितसिंह मोहिते पाटलांना दणका

  • भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यंदाच्या विधानसभा निकालात भाजपने १३२ जागा जिंकत इतिहास घडवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाणारे आणि पक्षात राहून विरोधकांचा प्रचार करणारे यांची कोंडी झाली आहे.
  • सोलापुरातील रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षाकडे केली होती. लोकसभेत आणि विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी पक्षाविरोधी काम केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आज भाजपने मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्यात पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले आहे.
  • लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात विशेषत: माढा, माळशिरस, अकलूज या पट्ट्यात मोहिते पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व आहे. धैर्यशील यांच्या उमेदवारीमुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतरांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. पण स्थानिक पातळीवर रणजितसिंह हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी होते. आता नोटीसाला ते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

Related Articles

Back to top button