क्राईम

साहेब, माझ्या बाळाला जिवंत करा

अलीकडे पुण्यामध्ये तनिषा भिसे या गर्भवतीवर रूग्णालयाने पैशांची तजवीज न केल्याने तात्काळ उपचार न केल्याने तिला तिचा जीव गमवावा लागल होता. याच घटनेची पुनरावृत्ती आता उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या जिल्ह्यामध्ये झाली आहे. या घटनेमध्ये रूग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने एका दाम्पत्याला त्यांचे नवजात बाळ गमवावे लागले आहे. या पित्याने बाळाला पिशवित घालत थेट डीम ऑफिसमध्ये नेले आणि माझे बाळ जिवंत करा म्हणत आक्रोश केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या जिल्ह्यामध्ये भिरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भानपूर गावातील रहिवासी विपीन गुप्ता यांची पत्नी गर्भवती होती. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर महेवागंज येथे गोलदरा रूग्णालायत दाखल केले. मात्र यावेळी रूग्णालयाने नॉर्मल डिलिव्हरीसाठी 10 हजार रूपये, ऑपरेशनसाठी 12 तर मोठ्या ऑपरेशनसाठी 25 हजारांची मागणी करण्यात आली. या दाम्पत्याकडे असलेले 8 हजार त्यांनी भरले. पण त्यांच्याकडे उर्वरित पैसे नव्हते. दरम्यान प्रसुतीकाळ जवळ येत होता. तरी देखील रूग्णालयाने उपचार सुरू केले नाहीत. 

त्यामुळे या कुटुंबाने या गर्भवतीला दुसऱ्या रूग्णालयात हलविले. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. त्यामुळे या महिलेला तिचे बाळ गमवावे लागले आहे. पण तिला हे ऐकून धक्का बसेल म्हणून ही गोष्ट या महिलेला तिच्या पतीने सांगितलेली नव्हती. त्याने नवजात बाळाला पिशवीत घालत थेट डीम ऑफिसमध्ये नेले आणि आपले बाळ जिवंत करा म्हणत आक्रोश केला. माझ्या पत्नीला ही गोष्ट माहिती नाही. ती बाळ मागत आहे. या घटनेने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते. 

दरम्यान या घटनेनंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गुप्ता आणि एसडीएम सदर अश्वीनी कुमार सिंह यांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर कारवाई सुरू करत डीएमच्या आदेशानुसार हे रूग्णालय सील करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये रूग्णालय आणि प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button