महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी फडणवीसांकडे सुप्रिया सुळेंनी केली ‘ही’ मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी अखेर सरकार स्थापन झाले. काल मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तशी फडणवीस यांची शपथ घेण्याची तिसरी वेळ ठरली आहे.

त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्याकडे लाडक्या बहिणींसाठी एक गोष्ट मागितली आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतरही योजना सुरु राहिल का? असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरु राहतील, असे वेळोवेळी सांगितले आहे. महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला दीड हजार ऐवजी 2100 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. आज सुळे यांनी महायुतीला त्याच आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.

देवेंद्रजी म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होत आहे. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा एक जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो तीन हजार रुपये द्या. कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना तीन हजार रुपये देणार होतो, असेही सुळे म्हणाल्या.

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप