महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना गुडन्यूज, डिसेंबरच्या हप्त्याची तारीख अखेर समोर

  • महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.
  • त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र, पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button