बिजनेस
जबरदस्त! अवघ्या 69 हजारात लाँच झाली होंडाची दमदार बाईक

- भारतीय बाजारात होंडा शाईन 100 चा नवीन 2025 अवतार सादर करण्यात आला आहे. यामध्ये OBD-2B अनुरूप इंजिन तसेच नवीन ग्राफिक्स आणि रंगसंगती देण्यात आली आहे. ही बाईक Hero HF100, Hero Splendor आणि Bajaj Platina 100 ला टक्कर देणार आहे.
- यामध्ये पूर्वीप्रमाणेच 98.98cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 7.38 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आता OBD-2B मानकांशी अनुरूप आहे. यासह 4-स्पीड गियरबॉक्स दिला आहे, जो बाईकच्या स्मूथ परफॉर्मन्ससाठी मदत करतो.
- होंडाने या बाईकला ब्लॅक बेस कलरमध्ये पाच नवीन कलर पर्याय दिले आहेत – ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ ऑरेंज, ब्लॅक विथ ग्रे आणि ब्लॅक विथ ग्रीन. यामध्ये नवीन ग्राफिक्स देखील जोडले आहेत, ज्यामुळे बाईक अधिक आकर्षक दिसते. होंडा शाईन 100 ची एक्स-शोरूम किंमत 68,767 ठेवण्यात आली आहे



