महाराष्ट्र
ब्रेकिंग! भाजपचे धक्कातंत्र, मुख्यमंत्रिपदी पुन्हा शिंदेच?

- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आली. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे.
- या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही.
- एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे.
- दिल्लीतील भाजपा वरिष्ठ नेतेमंडळी पुन्हा एकदा राज्यात धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून शिंदे होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
- शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. त्यामुळे जनमतांचा अनादर होऊ नये, अशी भूमिका भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांची आहे. दरम्यान विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएमविरोधात रान पेटवले आहे. तसेच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.



