हवामान

ब्रेकिंग! राज्यभरात पावसाचा हाहाकार, दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला

  • राज्यात आज पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. 
  • पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाणी साचले असून दौड तालुक्यातील कुरकंभ येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पुणे -सोलापूर महामार्गावरील पाटस येथे ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बीड आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमधील संपर्क तुटला आहे. तर सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे.
  • पुणे जिल्ह्यात तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. तर कुरकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. तसेच या पावसामुळे काही छोटे पूल हे पाण्याखाली गेले आहेत. तसेच वाहत्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Related Articles

Back to top button