देश - विदेश
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन

- भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावादरम्यान अमेरिकन विदेश मंत्री मार्क रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना वेगवेगळे काॅल केले आहेत.
- यासंबंधी एनआयएने माहिती दिली आहे.एनआयएनुसार, मार्को रुबियो यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल सचिवांनी दुःख व्यक्त केले आणि दहशतवादाविरुद्ध भारतासोबत सहकार्य करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
- तसेच मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान मुहम्मद शेहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्यासाठी, थेट संवाद पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी भारतासोबत काम करण्याचे आवाहन केले आहे.



