महाराष्ट्र
ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा ; खासदार प्रणिती शिंदे

- ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे म्हणजे जे 26 भारतीय मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखे आहे. आमच्या सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे संपूर्ण टेरर नेटवर्क उद्धवस्त केले, त्यांचा अपमान करण्यासारखे आहे.
- पाकिस्तानने आपल्यावर डागलेले एक हजार ड्रोन हवेतच उद्धवस्त करुन टाकले, त्या आपल्या भारतीय सैन्याचा अपमान केल्यासारखे आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता केली आहे.
- भाजपच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी प्रणिती शिंदेंनी लोकसभेत केलेल्या भाषणा संबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
- फडणवीस म्हणाले की, जर सेनेचा अपमान करणारे नेते आपल्याकडे असतील तर त्यांच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मोदींनी काल या नेत्यांना उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना जे बोलता येत नाही, ते नव्या नेत्यांकडून वदवून घेतले जात आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता या वक्तव्याचा मी धिक्कार करतो. या प्रवृत्तीचा धिक्कार करतो. जी भाषा पाकिस्तान बोलत आहे, तीच भाषा काँग्रेस नेते बोलत आहेत, हे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने आमचे काहीही नुकसान केले नाही, मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या एअर फिल्ड नष्ट केल्या. हे पंतप्रधानांनी पुराव्यानिशी सांगितले आहे, असे फडणवीस म्हणाले.



