सोलापूर

मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावले, महाविद्यालयीन तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

सध्या सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुण पिढी याच्या आहारी गेली आहे, असा आरोप सातत्याने होतो. याबाबत घरातील जेष्ठ मंडळींकडून तरुणांना व तरुणींना सातत्याने बजावले जाते. मात्र काहीच फरक पडत नाही अगदी शाळकरी मुले व मुलींनाही मोबाईलचे व्यसन जडलेले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे वडिलांनी रागवल्यामुळे एका महाविद्यालयीन तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आणि तिने आत्महत्या केली.

औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. आरती सिदलंबे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

वीस वर्षाच्या आरतीला मोबाईलचे व्यसन जडले होते. ती सतत मोबाईलमध्येच गुंग असायची. याच गोष्टीवरून आरतीला तिच्या आई-वडिलांनी अनेक वेळा समजावून सांगितले होते.
मात्र तिने ही गोष्ट मनावर घेतली नाही. दोनच दिवसांपूर्वी तिचे वडील सुनील हे काम उरकून घरी येत होते. घरात आल्यावर सुनील यांना आरतीच्या हातात मोबाईल दिसला. सुनील यांनी आरतीला सुनावले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरतीने विष पिऊन आत्महत्या केली.

Related Articles

Back to top button