राजकीय

नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पद सोडणार?

  • ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण अशा स्वरुपाची चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असा मोठा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
  • यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, असा पलटवार केला होता. आता राऊत यांनी राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, मोदींनाही जावे लागेल, असे म्हणत आरएसएसचे नियम सांगून महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
  • स्वतः मोदी यांनी एक नियम केला आहे की, त्यांच्या पक्षात 75 वर्ष झाले की सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये. तो लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला आहे. मग या नियमाच्या पलीकडे मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती. त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले. 17 सप्टेंबरला मोदी हे 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे. हे फडणवीस ठरवणार नाहीत, त्यांनी कितीही बोलू द्या, असेही राऊत म्हणाले.
  • त्याचबरोबर फडणवीस यांनी जे सांगितले आहे की, बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, मुघली संस्कृती आहे, कोण बाप? मोदी हे पंतप्रधान आहेत. एक तात्पुरती व्यवस्था असते. राम आणि कृष्ण आले आणि त्यांचे अवतारकार्य संपल्यावर गेले. त्यांनी जे काय कार्य हातात घेतले होते ते संपल्यावर ते निघून गेले. मोदी यांचे सुद्धा अवतारकार्य संपले आहे, त्यांना सुद्धा निघून जावे लागेल, असेही राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button