क्राईम
सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखम

- अलीकडे महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोनच दिवसापूर्वी झालेल्या बदलापूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार आहे. सोलापूर शहरातदेखील सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने संतापजनक विधान केले असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.
बदलापूरच्या शाळेत सफाईचे काम करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेने दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी एका मुलीच्या पालकांना संशय येताच तिला खासगी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या गुप्तांगांना दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर 16 ऑगस्टला पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले असता ती जखम मुलीला सायकल चालवण्यामुळे झाली असावी, असे विधान मुख्याध्यापिकेने केले. नाहीतर, शाळेबाहेर काही घडले असावे, असे ते म्हणाले. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेला अहवाल देखील फेटाळून लावला, असा दावा पीडितेच्या पालकांनी आहे. तसेच यावेळी एका महिला पोलीसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.