महाराष्ट्र

ब्रेकिंग! विधानसभेच्या आधी मला तुरुंगात पाठवण्याचा प्लॅन

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून न्यायालयाने राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राऊत यांनी जोरदार घणाघात केला आहे.


राऊत म्हणाले की, युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याचे काम मिळाले होते. त्या कामात भ्रष्टाचार किंवा घोटाळा झाल्याचा आरोप मी केलेला नाही. हा आरोप सर्वात पहिले मीरा-भाईंदर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता.
ज्या देशात पंतप्रधान मुख्य न्यायाधीशांची घरी गणपतीचे मोदक खायला जातात, तिथे आम्हाला न्याय मिळणार कुठे? अण्णाभाऊ साठेंनी एकदा म्हटले होते की, न्यायव्यवस्था कुणाची रखेल झाली आहे, पण मी तसे म्हणणार नाही. आम्ही न्यायालयाचा आदर करतो. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनाही असा त्रासच देण्यात आला. आता विधानसभा निवडणुका आल्या की आमच्या बाबतीतही तेच घडत आहे. ते जेव्हा आमच्यावर घाणेरडे आरोप करतात, ते मात्र डिफरमेशन होत नाही का? जर मला तुरुंगात पाठवण्याचा प्लॅन करत असतील तर मी तयार आहे. पण सत्य बोलल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button