राजकीय

ब्रेकिंग! मतमोजणीच्या पहिल्या दोन तासांत भाजप आघाडीवर

  • राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज मतमोजणीला सुरूवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. साकोलीतून नाना पटोले आघाडीवर आहेत.
  • पोस्टल मतदानात विदर्भात महायुती 12 जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार, कामठीतून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे, काटोलमधून भाजपचे चरणसिंह ठाकूर, तर बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर आहेत. दिग्रस मतदारसंघ मविआचे माणिकराव ठाकरे 973 मताने आघाडीवर आहेत.
  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार भाजप हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण साधारणतः 9.30 वाजेपर्यंत भाजपचे 75 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 28 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्या महायुती एकूण 145 जागांवर म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीची ही आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Related Articles

Back to top button