सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात जबरी चोरी

- सोलापूर : बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम तीन लाख रुपये चोरून नेल्याची घटना दहा डिसेंबर रोजी रात्री अकरा ते अकरा डिसेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षयकुमार ज्ञानेश्वर अंजीखाने (वय-30,व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर,रा.ई-23,महेश थोबडे नगर,गणपती मंदिर जवळ) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- यात अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे परगावी गेले असता अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून लॉकरमधील रोक रक्कम तीन लाख रुपये चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महाडिक हे करीत आहेत.



