महाराष्ट्र

ब्रेकिंग! पाऊस पुन्हा सक्रिय

राज्यात सध्या पावसाने बहुतांश भागात सुट्टी घेतली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची संततधार सुरु आहे, तर काही ठिकाणी ऊन पडल्याचे दिसून येत आहे. आज सोलापुरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान 24 तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. 
येत्या 48 तासात राज्यात विविध भागात पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button