देश - विदेश

ब्रेकिंग! देशात दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूची एक बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक अहवालानुसार दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. डीडी न्यूजने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी एका बसला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. बस दरीत कोसळ्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक प्रवासीही जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी एका बसला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. बस दरीत कोसळ्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक प्रवासीही जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button