महाराष्ट्र

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल

दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारपासून मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button