सोलापूर

सुषमा अंधारेंनी सोलापुरात फोडला नवा बॉम्ब

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख करत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात येतंय, असा आरोप अंधारे यांनी केला आहे.
सोलापुरातील महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, 83 कोटींचा भूखंड दोन कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी का तारांकीत म्हणून नोंदवला?, आज सभागृहात तब्बल चार मंत्र्यांच्या चौकशीत चारही मंत्री अडचणीत आले आहेत. ज्या चार मंत्र्यांवर आरोप करण्यात आलेत ते चारही मंत्री शिंदे गटातील आहेत. टीम भाजप पद्धतशीरपणे मुख्यमंत्री शिंदे यांनाही अडचणीत आणत आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Related Articles

Back to top button