महाराष्ट्र

राज्यात उष्णतेची लाट

यंदाच्या एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे लोक चांगलेच भाजून निघाले. त्यात आता मेमध्येही उष्णतेच्या लाटांचा तडाखा कायम राहणार असून, देशाच्या विविध भागात मेमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिला आहे.

एप्रिलमध्ये मुंबई, ठाणे, सोलापूर, रायगडसह देशाच्या विविध भागात उष्णतेच्या लाटा आल्या व सर्वसाधारण तापमान ४० ते ४३ अंशाच्या आसपास नोंदवले गेले.
आता भारतीय हवामान खात्याने मे महिन्याचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्व-उत्तर-पश्चिम व मध्य भारताचा काही भाग वगळता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड़ा, गुजरातमध्ये पाच ते आठ अतिरिक्त दिवस उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button